ترجمة سورة الشعراء

الترجمة الماراتية

ترجمة معاني سورة الشعراء باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية.
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. ता - सीन - मीम.
२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत.
३. त्यांनी ईमान न राखल्याबद्दल कदाचित तुम्ही आपला जीव सोडाल.
४. जर आम्ही इच्छिले असते तर त्यांच्यावर आकाशातून एखादी अशी निशाणी अवतरित केली असती की जिच्यासमोर त्यांच्या माना झुकल्या असत्या.
५. आणि त्यांच्याजवळ रहमान (दयावान अल्लाह) कडून जे देखील नवे बोध- उपदेश आले, त्याकडून तोंड फिरविणारे बनले.
६. त्या लोकांनी खोटे ठरविले आहे, आता लवकरच त्यांच्याजवळ, त्या गोष्टीची वार्ता येऊन पोहचेल, जिची ते थट्टा उडवित आहेत.
७. काय त्यांनी जमिनीकडे नाही पाहिले की आम्ही तिच्यात प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या कितीतरी उगविल्या आहेत.
८. निःसंशय त्यात मोठी निशाणी आहे, तथापि त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणार नाहीत.
९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता वर्चस्वशाली आणि दयावान आहे.
१०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने मूसाला पुकारले की तू अत्याचारी जनसमूहाजवळ जा.
११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत?
१२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते की कदाचित त्यांनी मला खोटे (न) ठरवावे.
१३. आणि माझी छाती (हृदय) संकुचित होत आहे. माझी जीभ वळत नाही यास्तव तू हारूनकडेही वहयी (प्रकाशना) पाठव.
१४. आणि त्यांचा माझ्यावर, माझ्या एका चुकीचा (दावा) ही आहे. मला भय वाटते की कदाचित त्यांनी माझी हत्या न करून टाकावी.
१५. (अल्लाहने) फर्माविले, असे कदापि होणार नाही. थुम्ही दोघे आमच्या निशाण्यांसह जा. आम्ही स्वतः ऐकणारे तुमच्या सोबतीला आहोत.
१६. तुम्ही दोघे फिरऔनजवळ जाऊन सांगा की निःसंशय आम्ही साऱ्या जगाच्या पालनकर्त्यातर्फे पाठविलेले आहोत.
१७. की तू आमच्यासोबत इस्राईलच्या संततीला पाठव.
१८. (फिरऔन) म्हणाला, काय आम्ही तुझे, तुझ्या बालपणात आपल्या येथे पालनपोषण केले नव्हते? आणि तू आपल्या वयाची (आयूष्याची) अनेक वर्षे आमच्यात नाही काढलीत?
१९. आणि नंतर तू जे आपले काम केले ते केले आणि तू कृतघ्न लोकांपैकी आहेस.
२०. (मूसा) म्हणाले, मी हे काम अशा वेळी केले जेव्हा मी वाट चुकलेल्या लोकांपैकी होतो.
२१. नंतर मी तुमच्या दहशतीमुळे तुमच्यापासून पळालो, मग मला माझ्या पालनकर्त्याने आदेश व ज्ञान प्रदान केले आणि मला आपल्या पैगंबरांपैकी केले.
२२. आणि काय माझ्यावर तुझा हाच तो उपकार आहे? जो तू जाहीर करीत आहेस की तू इस्राईलच्या संततीला गुलाम बनवून ठेवले आहे.
२३. फिरऔन म्हणाला की सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता काय आहे?
२४. (हजरत मूसा) म्हणाले, तो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंचा स्वामी व पालनकर्ता आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल.
२५. (फिरऔन) आपल्या निकटच्या लोकांना म्हणाला, काय तुम्ही ऐकत नाही?
२६. (हजरत मूसा) म्हणाले, तो तुमचा आणि तुमच्या पूर्वजांचाही स्वामी व पालनकर्ता आहे.
२७. (फिरऔन) म्हणाला, (लोकांनो) तुमचा हा पैगंबर, जो तुमच्याकडे पाठविला गेला आहे, हा तर अगदीच वेडा आहे.
२८. (हजरत मूसा) म्हणाले, तोच पूर्व आणि पश्चिमेचा आणि त्याच्या दरम्यान असलेल्या समस्त वस्तूंचा पालनकर्ता आहे, जर तुम्ही अक्कल बाळगत असाल.
२९. (फिरऔन) म्हणाला, खबरदार जर तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला उपास्य बनविले तर मी तुला कैद करून टाकीन.
३०. (मूसा) म्हणाले, मी तुझ्याजवळ एखादी स्पष्ट वस्तू घेऊन आल्यावरही?
३१. (फिरऔन) म्हणाला, जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर ती सादर कर.
३२. त्यांनी (त्याच वेळी) आपली काठी खाली टाकली ती अचानक उघड उघड (फार मोठा) अजगर बनली.
३३. आणि आपला हात बाहेर काढला तर तो देखील त्याच क्षणी पाहणाऱ्यांना शुभ्र प्रकाशमय दिसू लागला.
३४. (फिरऔन) आपल्या जवळच्या सरदारांना म्हणू लागला की हा तर फार मोठा निष्णात जादूगार आहे.
३५. हा तर असे इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या भूमीतून बाहेर काढावे. सांगा, आता तुम्ही काय सल्ला देता?
३६. ते सर्व म्हणाले, तुम्ही याला आणि याच्या भावाला सवड द्या आणि सर्व शहरांमध्ये (लोकांना) एकत्र करणारे पाठवा.
३७. ज्यांनी तुमच्याजवळ निष्णात जादूगारांना घेऊन यावे.
३८. मग एका निर्धारित दिवसाच्या वेळी सर्व जादूगार एकत्रित केले गेले.
३९. आणि सर्वसामान्य लोकांनाही सांगितले गेले की तुम्ही देखील जमा व्हाल.
४०. यासाठी की जर जादूगार प्रभावी ठरले तर आम्ही त्यांचेच अनुसरण करू.
४१. जादूगार येऊन फिरऔनला म्हणू लागले की जर आम्ही जिंकलो तर आम्हाला काही बक्षीस वगैरे मिळेल ना!
४२. (फिरऔन) म्हणाला, होय! (मोठ्या खुशीने) किंबहुना अशा परिस्थितीत तुम्ही माझे खास दरबारी व्हाल.
४३. (हजरत) मूसा जादूगारांना म्हणाले, जे काय तुम्हाला टाकायचे आहे, ते टाका.
४४. त्यांनी आपल्या दोऱ्या आणि काठ्या खाली टाकल्या आणि म्हणाले, फिरऔनच्या प्रतिष्ठेची शपथ, आम्ही अवश्य विजयी होऊ.
४५. आता (हजरत) मूसा यांनीही आपली काठी खाली टाकली, जिने त्याच क्षणी त्यांचा असत्याचा बनविलेला खेळ गिळायला सुरुवात केली.
४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले.
४७. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तर सर्व विश्वाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले.
४८. अर्थात मूसा आणि हारूनच्या पालनकर्त्यावर.
४९. (फिरऔन) म्हणाला, माझी परवानगी घेण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर ईमान राखले, निश्चितच हा तुमचा सरदार (मोठा गुरू) आहे, ज्याने तुम्हा सर्वांना जादू शिकवली आहे. तेव्हा तुम्हाला अत्ताच माहीत पडेल. शपथ आहे. मी देखील तुमचे हात पाय विरूद्ध दिशांनी कापून टाकीन आणि तुम्हा सर्वांना फासावर लटकवीन.
५०. ते म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही तर आपल्या पालनकर्त्याकडे परतून जाणारच आहोत.
५१. या कारणास्तव की आम्ही सर्वांत प्रथम ईमान राखणारे बनलो आहोत, आम्ही आशा बाळगतो की आमचा स्वामी व पालनकर्ता आमच्या सर्व चुका माफ करील.
५२. आणि आम्ही मूसावर वहयी (प्रकाशना) केली की रात्रीच्या रात्री माझ्या दासांना घेऊन निघा. तुम्हा सर्वांचा पाठलाग केला जाईल.
५३. फिरऔनने शहरांमध्ये जमा करणाऱ्यांना पाठविले.
५४. की निश्चितच हा समूह अतिशय कमी संख्येत आहे.
५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत.
५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे.
५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले.
५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून.
५९. अशा प्रकारे झाले, आणि आम्ही त्या (सर्व वस्तूं) चा वारस इस्राईलच्या संततीला बनविले.
६०. यास्तव फिरऔनचे अनुयायी सूर्य उगवताच त्यांचा पाठलाग करण्यास निघाले.
६१. यासाठी जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिले तेव्हा मूसाचे साथीदार म्हणाले, आम्ही तर खात्रीने पकडीत आलो.
६२. (हजरत मूसा) म्हणाले, कदापि नाही. विश्वास राखा, माझा रब (पालनकर्ता) माझ्या सोबतीला आहे. जो जरूर मला मार्ग दाखविल.
६३. आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की समुद्राच्या पाण्यावर आपल्या काठीचा प्रहार करा तेव्हा त्याच क्षणी समुद्र दुभंगला आणि प्रत्येक हिस्सा पाण्याच्या मोठ्या पर्वताइतका झाला.
६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले.
६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली.
६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले.
६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत.
६८. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा वर्चस्वशाली आणि दया करणारा आहे.
६९. आणि त्यांना इब्राहीमचा वृत्तांतही ऐकवा.
७०. जेव्हा त्यांनी आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना फर्माविले की तुम्ही कोणाची उपासना करता?
७१. त्यांनी उत्तर दिले की आम्ही मूर्तींची उपासना करतो. आम्ही तर सतत त्यांचे उपासक बनून बसलो आहोत.
७२. पैगंबर (इब्राहीम अलै.) यांनी विचारले, जेव्हा तुम्ही यांना पुकारता तेव्हा काय ते ऐकतातही?
७३. किंवा तुम्हाला नफा - नुकसानही पोहचवू शकतात?
७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत.
७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात?
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील.
७७. ते सर्व माझे शत्रू आहेत, त्या सच्चा अल्लाहखेरीज, जो सर्व विश्वाचा पालनकर्ता आहे.
७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो.
७९. तोच आहे जो मला खाऊ-पिऊ घालतो.
८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य प्रदान करतो.
८१. आणि तोच मला मृत्यु देईल आणि मग पुन्हा जिवंत करील.
८२. आणि ज्याच्याकडून आशा बाळगतो की तो मोबदला दिला जाण्याच्या दिवशी माझे अपराध माफ करील.
८३. हे माझ्या पालनकर्त्या! मला हिकमत (बुद्धी कौशल्य) प्रदान कर आणि मला नेक- सदाचारी लोकांमध्ये सामील कर.
८४. आणि माझे पवित्र - स्मरण (भविष्यात) येणाऱ्या लोकांमध्येही बाकी ठेव.
८५. आणि मला सुखांनी भरलेल्या जन्नतच्या वारसांपैकी बनव.
८६. आणि माझ्या पित्यास क्षमा कर. निःसंशय तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी होता.
८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला अपमानित करू नकोस.
८८. ज्या दिवशी धन-संपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही.
८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल.
९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल.
९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल.
९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत?
९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात?
९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील.
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही.
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील,
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो.
९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो.
९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते.
१००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही.
१०१. आणि ना एखादा (सच्चा) हितचिंतक मित्र.
१०२. जर आम्हाला एक वेळ दुसऱ्यांदा जाण्याची संधी लाभली असती तर आम्ही पक्के सच्चे ईमानधारक बनलो असतो.
१०३. निःसंशय, यात एक फार मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नाहीत.
१०४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे.
१०५. नूहच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले.
१०६. जेव्हा त्यांचा भाऊ नूह यांनी सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत?
१०७. (ऐका!) मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे.
१०८. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि माझे म्हणणे मान्य केले पाहिजे.
१०९. आणि मी तुमच्याकडून त्याबद्दल कोणताही मोबदला इच्छित नाही. माझा मोबदला तर केवळ सर्व विश्वांचा पालनकर्त्याजवळ आहे.
११०. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा.
१११. (जनसमूहाने) उत्तर दिले की काय आम्ही तुमच्यावर ईमान राखावे? तुमचे आज्ञापालन करणारे तर हलक्या प्रतीचे लोक आहेत.
११२. (नूह) म्हणाले, मला काय माहीत की पूर्वी ते काय करीत राहिलेत?
११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल.
११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही.
११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे.
११६. ते म्हणाले, हे नूह! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला दगडांचा मारा करून ठार केले जाईल.
११७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या जनसमूहाच्या लोकांनी मला खोटे ठरविले.
११८. तेव्हा तू, माझ्या आणि त्यांच्या दरम्यान निश्चितच फैसला कर, आणि मला व माझ्या ईमानधारक साथीदारांना मुक्ती प्रदान कर.
११९. यास्तव आम्ही त्याला आणि त्याच्या साथीदारांना भरलेल्या नौकेत (स्वार करून) सुटका प्रदान केली.
१२०. मग त्यानंतर बाकीच्या सर्व लोकांना आम्ही बुडवून टाकले.
१२१. निःसंशय, यात मोठा बोध आहे परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हतेच.
१२२. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे.
१२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले.
१२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत.
१२५. मी तुमचा विश्वस्त पैगंबर (संदेशवाहक) आहे.
१२६. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा.
१२७. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही, माझे पारिश्रमिक (मोबदला) तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याजवळ आहे.
१२८. काय तुम्ही प्रत्येक उंच स्थानावर खेळस्वरूप करमणुकीचे चिन्ह (स्मारक) बनवित आहात?
१२९. आणि मोठ्या उद्योगाचे (मजबूत महाल निर्माण) करीत आहात, जणू काही तुम्ही सदैवकाळ इथेच राहाल.
१३०. आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता, तेव्हा मोठ्या कठोरपणे पकडता.
१३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा,
१३२. आणि त्याचे भय बाळगा, ज्याने त्या गोष्टीद्वारे तुमची मदत केली, ज्यांना तुम्ही जाणता.
१३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे.
१३४. आणि बागा आणि झऱ्यांद्वारे.
१३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते.
१३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी राहू नका आमच्याकरिता सारखेच आहे.
१३७. हा तर प्राचीन काळाच्या लोकांचा दीन (धर्म) आहे.
१३८. आणि आम्ही कदापि शिक्षा- यातना प्राप्त करणाऱ्यांपैकी असणार नाही.
१३९. ज्याअर्थी ‘आद’ जनसमूहाच्या लोकांनी (हजरत) हूद यांना खोटे ठरविले यासाठी आम्ही त्यांना नष्ट केले. निःसंशय, यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नव्हते.
१४०. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे.
१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले.
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही?
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे.
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा.
१४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे.
१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल?
१४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये.
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात.
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता.
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा.
१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा.
१५२. जे धरतीत फसाद (उत्पात) पसरवित आहेत आणि सुधारणा करीत नाही.
१५३. ते म्हणाले, तू तर अशा लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला गेला आहे.
१५४. तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे. जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर एखादा मोजिजा (ईशचमत्कार) घेऊन ये.
१५५. (स्वालेह) म्हणाले, ही सांडणी आहे. पाणी प्यायची एक पाळी हिची, आणि एका निर्धारित दिवशी पाणी पिण्याची पाळी तुमची.
१५६. (आणि खबरदार!) हिला वाईट हेतुने हात लावू नका, अन्यथा एका मोठ्या दिवसाची शिक्षा- यातना तुम्हाला येऊन धरेल.
१५७. तरीही त्यांनी तिचे हात पाय कापून टाकले, नंतर पश्चात्ताप करणारे झाले.
१५८. तेव्हा अज़ाब (अल्लाहच्या शिक्षा- यातने) ने त्यांना येऊन धरले. निःसंशय, यात मोठी शिकवण (बोध) आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते.
१५९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे.
१६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले.
१६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत?
१६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे.
१६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा.
१६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या मोबदल्याची जबाबदारी केवळ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यावर आहे.
१६५. काय तुम्ही जगातल्या लोकांपैकी पुरुषांजवळ जाता?
१६६. आणि तुमच्या ज्या स्त्रियांना अल्लाहने तुमची पत्नी बनविले आहे त्यांना सोडून देता, खरी गोष्ट अशी की तुम्ही आहातच मर्यादा ओलांडणारे.
१६७. (त्यांना) उत्तर दिले की हे लूत! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला बाहेर काढले जाईल.
१६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे.
१६९. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या कुटुंबाला या (कुकर्मा) पासून वाचव, जे हे करीत आहेत.
१७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले.
१७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली.
१७२. मग आम्ही इतर सर्वांना नष्ट करून टाकले.
१७३. आणि आम्ही त्यांच्यावर एक खास प्रकारचा पाऊस पाडला. तो मोठा वाईट पाऊस होता, जो खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर पडला.
१७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नव्हते.
१७५. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दया करणारा आहे.
१७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले.
१७७. जेव्हा (पैगंबर) शुऐब त्यांना म्हणाले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत?
१७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे.
१७९. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा, आणि माझे आज्ञापालन करा.
१८०. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नाही. माझ्या मोबदल्याची जबाबदारी तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्यार आहे.
१८१. माप - तोल पुरेपूर करा आणि कमी देणाऱ्यांमध्ये सामील होऊ नका.
१८२. आणि सरळ (उचित) तराजूने तोल करून द्या.
१८३. आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी करून देऊ नका आणि (निर्भय होऊन) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित फिरू नका.
१८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि पूर्वीच्या निर्मितीला निर्माण केले.
१८५. (ते) म्हणाले, तू तर त्या लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला जातो.
१८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही तर तुला खोटे बोलणाऱ्यांपैकीच समजतो.
१८७. जर तुम्ही सच्चा लोकांपैकी असाल तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा कोसळवा.
१८८. पैगंबर म्हणाले की माझा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणणारा आहे, जे काही तुम्ही करीत आहात.
१८९. यास्तव त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा त्यांना सावलीवाल्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा- यातने) ने धरले. तो मोठ्या भयंकर दिवसाचा अज़ाब होता.
१९०. निःसंशय, त्यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते.
१९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे.
१९२. आणि निःसंशय हा (कुरआन) सर्व विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केला आहे.
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे.
१९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे.
१९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे.
१९६. आणि पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांच्या ग्रंथांमध्येही या (कुरआन) ची चर्चा आहे.१
____________________
(१) अर्थात ज्याप्रमाणे अंतिम पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आगमनाचे व त्यांच्या गुणविशेषांचे वर्णन अन्य ग्रंथांत आहे, तद्‌वतच या कुरआनाच्या अवतरणाची शुभवार्ता देखील त्या ग्रंथांमध्ये दिली गेली. एक दुसरा अर्थ ्‌सा घेतला गेला की हा कुरआन त्या आदेशानुसार ज्यावर सर्व शरियतीत एकता राहिली, पूर्वीच्या ग्रंथांमध्येही अस्तित्वात राहिला आहे.
१९७. काय त्यांच्यासाठी ही निशाणी पुरेशी नाही की (कुरआनच्या सत्यतेला) इस्राईलच्या संततीचे विद्वानही जाणतात.
१९८. आणि जर आम्ही याला (अरबी भाषेऐवजी) अन्य एखाद्या भाषेच्या व्यक्तीवर अवतरित केले असते.
१९९. तर त्याने त्यांच्यासमोर याचे वाचन केले असते, पण यांनी त्यास मानले नसते.
२००. अशा प्रकारे आम्ही दुराचारी लोकांच्या मनात (इन्कार) दाखल केला आहे.
२०१. ते जोपर्यंत दुःखदायक शिक्षा- यातना (स्वतः) पाहून घेत नाहीत. तो पर्यंत ईमान राखणार नाहीत.
२०२. यास्तव तो (अज़ाब) अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना त्यांची कल्पना (अनुमान) देखील नसेल.
२०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला जाईल?
२०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे?
२०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला,
२०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते.
२०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी काहीही त्यांना उपयोग पडू शकणार नाही.
२०८. आणि आम्ही कोणत्याही वस्तीला नष्ट केले नाही, परंतु अशाच स्थितीत की तिच्यासाठी खबरदार करणारे होते.
२०९. बोध (उपदेशा) च्या स्वरूपात आणि आम्ही अत्याचार करणार नाही.१
____________________
(१) अर्थात पैगंबर पाठविल्याविना आणि त्यांच्याद्वारे सावधान केल्याविना जर आम्ही एखाद्या जनसमूहाला नष्ट केले असते तर हा अत्याचार ठरला असता. आम्ही असे कधीही केले नाही किंबहुना न्याय - नियमानुसार प्रथम त्यांना खबरदार केले, त्यानंतर जेव्हा त्यांनी पैगंबराचे म्हणणे मानले नाही, तेव्हा आम्ही त्यांचा नाश केला. हाच विषय सूरह बनी इस्राईल - १८ आणि सूरह अल कसस - ५९ मध्येही उल्लेखिला गेला आहे.
२१०. आणि या (कुरआन) ला सैतान घेऊन आले नाहीत.
२११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे सामर्थ्य आहे.
२१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत.
२१३. यास्तव तुम्ही अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या आराध्य दैवताला पुकारू नका अन्यथा तुम्हीही शिक्षा प्राप्त करणाऱ्यांपैकी व्हाल.
२१४. आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना (अल्लाहचे) भय दाखवा.
२१५. आणि त्यांच्याशी नरमीने वागा, जो कोणी ईमानधारक होऊन तुमच्या अधीन होईल.
२१६. जर हे लोक तुमची अवज्ञा करतील तर तुम्ही ऐलान करा की तुम्ही जे काही करीत आहात मी त्यापासून अलिप्त आहे.
२१७. आणि आपला पूर्ण भरोसा त्यावर राखा जो वर्चस्वशाली, दयावान आहे.
२१८. जो तुम्हाला पाहत असतो, जेव्हा तुम्ही (नमाजसाठी) उभे राहता.
२१९. आणि सजदा करणाऱ्यांमध्ये तुमचे हिंडणे फिरणेही.
२२०. निःसंशय तो (अल्लाह) मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे.
२२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात?
२२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात.
२२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत.
२२४. आणि कवींचे अनुसरण तेच लोक करतात, जे पथभ्रष्ट असावेत.
२२५. काय तुम्ही नाही पाहिले की कवी दरी - दरीत डोके आपटत फिरतात.
२२६. आणि ते जे म्हणतात ते करत नाहीत.
२२७. त्यांच्याखेरीज ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत आणि मोठ्या संख्येने अल्लाहची प्रशंसा (नामःस्मरण) करीत राहिले आणि आपण अत्याचारपीडित असल्यानंतर सूड घेतला, आणि ज्यांनी अत्याचार केला आहे ते देखील लवकरच जाणून घेतील की कोणत्या कुशीवर उलटतात.
سورة الشعراء
معلومات السورة
الكتب
الفتاوى
الأقوال
التفسيرات

سورةُ (الشُّعَراء) سورةٌ مكِّية، افتُتِحت بتعظيم القرآن، وخُتِمت بذلك، وتخلَّلَ البدايةَ والخاتمة ذِكْرُ قِصَصِ عددٍ من الأنبياء، ومقصودُ السورة الأعظم: بيانُ عُلُوِّ هذا الكتاب وإعجازِه، وسُمُوِّه عن أن يكونَ شِعْرًا، أو مِن كلامِ بشَرٍ، وجاءت الآيةُ على وصفِ الشُّعَراء وطريقِهم بالغَواية في أصلها إلا مَن اتَّقَى؛ وذلك شأنُ الأقلِّ من الشُّعَراء.

ترتيبها المصحفي
26
نوعها
مكية
ألفاظها
1320
ترتيب نزولها
47
العد المدني الأول
226
العد المدني الأخير
226
العد البصري
226
العد الكوفي
227
العد الشامي
227

* سورة (الشُّعَراء):

سُمِّيت سورةُ (الشُّعَراء) بهذا الاسم؛ لاختتامِها بذِكْرِهم في قوله: {وَاْلشُّعَرَآءُ يَتَّبِعُهُمُ اْلْغَاوُۥنَ} [الشعراء: 224].

* سورة (الظُّلَّةِ):

سُمِّيت بذلك؛ لقوله تعالى فيها: {فَكَذَّبُوهُ فَأَخَذَهُمْ عَذَابُ يَوْمِ ‌اْلظُّلَّةِۚ} [الشعراء: 189].

جاءت موضوعات سورة (الشُّعَراء) على النحو الآتي:

1. تعظيم القرآن، وتَسْريةٌ للرسول عليه السلام (١-٩).

2. قصص الأنبياء (١٠-١٩١).

3. قصة موسى عليه السلام (١٠-٦٨).

4. قصة إبراهيمَ عليه السلام (٦٩-١٠٤).

5. قصة نُوحٍ عليه السلام (١٠٥- ١٢٢).

6. قصة هُودٍ عليه السلام (١٢٣-١٤٠).

7. قصة صالح عليه السلام (١٤١-١٥٩).

8. قصة لُوطٍ عليه السلام (١٦٠- ١٧٥).

9. قصة شُعَيبٍ عليه السلام (١٧٦-١٩١).

10. تعظيم القرآن، وإثبات نبوَّة محمد صلى الله عليه وسلم، وتفنيد شُبهات المشركين (١٩٢-٢٢٧).

ينظر: "التفسير الموضوعي للقرآن الكريم" لمجموعة من العلماء (5 /327).

مقصودُ سورةِ (الشُّعَراءِ): إعلاءُ شأنِ هذا الكتاب، وأنَّه بيِّنٌ في نفسه: بإعجازه أنه من عند الله، مُبيِن لكل ملتبِس: بالإشارة إلى إهلاك مَن عَلِمَ منه دوامَ العصيان، ورحمةِ من أراده للهداية والإحسان.

وتسميتُها بـ(الشُّعَراء) أدلُّ دليلٍ على ذلك؛ بما يفارِقُ به القرآنُ الشِّعْرَ من عُلُوِّ مقامه، واستقامةِ مناهجه، وعِزِّ مَرامِه، وصِدْقِ وعده ووعيده، وعدلِ تبشيره وتهديده، وفيه وصفُ طريقِ القرآن بكمال الهداية والرَّشاد.

ينظر: "مصاعد النظر للإشراف على مقاصد السور" للبقاعي (2 /326).